नमस्कार मंडळी,

मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा
उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा

दिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळ
बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ.. 

हा लेख लिहायला घेतला आणि बाहेर सुरू असलेल्या पाऊसधारा गेल्या काही महिन्यातल्या अनेक आठवणी घेऊन आल्या आहेत.बघता बघता अर्ध वर्ष उलटून गेलं. कोविडच्या विळख्यातूनही जग हळूहळू बाहेर पडायला लागलंय.मोकळया हवेत,मोकळ्या आकाशाखाली जगण्याचे उत्सवी रंग पुन्हा एकदा खुणावू लागले आहेत आणि लाइफ इज ब्यूटीफूल अशी ग्वाही देऊ लागले आहेत.

या उत्सवाचाच एक रंग म्हणजे ‘अटलांटिक सिटी,न्यू जर्सी’ येथे १० ते १४ ऑगस्ट २०२२ रोजी होऊ घातलेले आपले BMM अधिवेशन.अहो,आपल्या घरचंच कार्य हे. तर ही लगीनघाई जोरात सुरू झालीय बऱं का! हॉटेलचे करार,अधिवेशन स्थळाची अनामत रक्कम,हे सगळे ठरवून तयार आहेत.त्याचप्रमाणे BMM च्या इतिहासात पहिल्यांदाच सेलिब्रिटी शेफ आपण अधिवेशनाला घेऊन येत आहोत. केला आहे.

अजून एक आनंदाची बातमी म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे डीन  श्रीकांत दातार यांनी बिझनेस कॉन्फरन्स चे प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

आपले आवडते सुप्रसिद्ध कलाकार आणि अनेक अभिनव उपक्रम यांची रेलचेल असणार आहे.

आपल्या अधिवेशनाविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर जाऊन तुम्ही केव्हाही पाहू शकता आपली वेबसाइट: https://bmm2022.org/
फेसबूक : https://facebook.com/bmm2022nj/

आपले कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत अधिवेशनाचा हा अद्वितीय अनुभव घ्यायला जरूर या.आपल्या मराठीच्या या उत्सवाला आपण सगळे मिळून ऐतिहासिक अविस्मरणीय बनवू या.

कोविड च्य कठीण काळात सामाजिक भान जागृत ठेवत BMM ने सुरू केलेल्या कोविड हेल्पलाईन चा लाभही  अनेकांना घेता आला याचे समाधान वाटते.

याच टप्प्यावर अल्लमा इक्बाल यांचा शेर कायम मनात असतो,

‘ सितारों के आगे जहां और भी है। अभि इश्क के इम्तिहां और भी है।‘

तेव्हा थांबून कसं चालेल.तर आता पुढचा टप्पा म्हणजे BMM चे जागतिकीकरण.बृहन महाराष्ट्र मंडळांच्या जागतिकरणाचा उपक्रम चालू केला आहे. जपान चे मंडळ  सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे , लवकरच त्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन पुढील पावले उचलली जातील.  या पुढच्या टप्प्यावरही आपला सहभाग आणि प्रतिसाद असाच राहिला तर आपली मराठी खऱ्या अर्थाने ‘विश्वात्मक’ होण्याचा दिवस दूर नाही हे निश्चित!

आपली नम्र,
बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोशी