Texas Event

स्वरलय विरासत

When
Which State?

Texas

Key Performers

बांसरी - पं. विवेक सोनार (मुंबई)
संतूर - पं. मदन ओक (सॅन फ्रान्सिस्को)
तबला - पं. आदित्य कल्याणपूर (लॉस एंजलिस)

संगीत ही एक वैश्विक भाषा आहेउत्तम संगीत हे हृदयाला स्पर्श करून जातेमग ते पाश्चिमात्य असो वा हिंदुस्थानी शास्त्रीयपरंतु पाश्चिमात्य संगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत यांत फरक आहेतो आहे गुरुशिष्य परंपरेचापारंपारिक पद्धतीने केलेल्या ज्ञानदानाचागुरुच्या पिढीने गुणी आणि सत्पात्र अशा तरुण पिढीला हे ज्ञान मौखिक पद्धतीने दान करण्याचा.

पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मापद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियाउस्ताद झाकीर हुसेन या दिग्गज कलाकारांनी संतूरबांसरीतबला यांसह हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहेया गुरुवर्यांनी संगीताचा एक उच्च मापदंडच घालून दिला आहेजगभरातील त्यांचे शिष्य काटेकोर कठोर मापदंडातून कित्येक वर्षं ज्ञानार्जन करत आहेत आणि गुरुंची थोर परंपराघराणी पुढे नेत आहेत.

 स्वरलय विरासत  या कार्यक्रमातून संतूर आणि बांसरीवर आधारित काही संगीत प्रकार आपल्यासाठी घेऊन येत आहोत. 

               – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत

               – लोकसंगीत (Light Indian), 

               – मिश्र संगीत (Indo-Western Fusion) 

               – चित्रपट संगीत 

या वादनातून साक्षात त्यांच्या गुरुजनांच्या सांगितिक प्रवासाचेच प्रतिबिंब आपल्याला दिसले नाही तरच नवल!