बृ. म. मंडळ अधिवेशन २०२२

बोधचिन्ह विजेते : सुधाकर मोरे ( मुंबई, इंडिया)

घोषवाक्य विजेते : मनोज ताम्हणकर (सॅन होसे, कॅलिफोर्निया

‘बृ. म. मंडळाच्या २०२२ मध्ये अटलांटिक सिटी न्यू जर्सी थेथे होणाऱ्या २०व्या अधिवेशनासाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा साधारण नोव्हेंबर च्या शेवटी जाहीर करण्यात आली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतूनच नव्हे तर परदेशातूनही स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. आमच्या मार्केटिंग टीम ने उत्तम काम केले आणि विविध सोशल मीडिया च्या मदतीने जगभरच्या लोकांपर्यंत बीएमएम २०२२ अधिवेशनाची माहिती पोहचवली. व्हँकुव्हर कॅनडा पासून ते विरार इंडिया हुन आम्हाला प्रवेशिका आल्यात. पन्नास हुन ही अधिक स्पर्धाकांनी यात भाग घेतला.

बीएमएम २०२२ या २०व्या अधिवेशनाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. बीएमएम २०२२ साठी निवडलेले बोधचिन्ह आणि घोषवाक्य तुम्हा सगळ्यांसमोर जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आमची निवड तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे. बोधचिन्ह आणि घोषवाक्य विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

बीएमएम २०२२ च्या अधिवेशनासाठी घोषवाक्य म्हणून सोहळा अस्तित्वाचा” हे सॅन होसे, कॅलिफोर्निया तेथील श्री. मनोज ताम्हणकर यांनी दिलेले घोषवाक्य निवडण्यात आले आहे. सध्याचा अभूतपूर्व परिस्थितीमुळे जीवन किती मौल्यवान आहे, जीवन किती सुंदर आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने झाली आहे. कोविद-१९ च्या संकटावर वर आपण आज ना उद्या मात करूच आणि आयुष्य पुन्हा सुरळीत होईल आणि अस्तित्वाचा सोहळा एकत्र मिळून साजरा करायला आपण पुनःश्च तयार असू.

तसेच अधिवेशनासाठी निवडलेले बोधचिन्ह मराठी संस्कृतीचे मिश्रण आणि अधिवेशनाच्या उत्तर अमेरिकेतील अटलांटिक सिटी, न्यू जर्सी तिथल्या जागेचे महत्व या दोन्ही गोष्टी दाखवते म्हणूनच होणाऱ्या अधिवेशनाला हे बोधचिन्ह खूप समर्पक आहे. हे बोधचिन्ह तयार करून मुंबई, इंडिया थेथील श्री. सुधाकर मोरे या स्पर्धेचे विजेते ठरले आहे.

या बोधचिन्हातला उगवणारा सूर्य या अधिवेशनातल्या सकारात्मक ऊर्जेचा आणि आशेचे प्रतीक आहे आणि भगवे झेंडे उत्तुंगतेचा ध्यास व मराठी संस्कृती बदल आपला अभिमान दर्शवते व त्याबरोबर अमेरिकन आणि कॅनडा यांचे राष्ट्रीय ध्वज आपल्या कर्मभूमीची जाणीव करून देते. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत तुतारी वाजवून आणि हळदी कुंकू लावून दिलखुलासपणे आणि मोकळ्या मनाने करू अशी आमची तत्परता दर्शवते.

सह-संयोजक श्री. अमर उरहेकर ह्यांचा शब्दांमध्ये

कोविड नंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येनी हा सोहोळा संपन्न करण्यासाठी आपण जमणार आहोत, म्हणून उगवत्या सूर्याची पार्श्वभूमी ही आशावादाच प्रतीक म्हणून वापरली आहे.

हा सोहोळा मराठी माणसाचा आहे, त्यामुळे भगवा झेंडा हे आपल्या अभिमानाच, पताका हे विजयाच आणि हळदीकुंकू हे पावित्रता आणि मांगल्याच प्रतिक म्हणून दाखवल आहे.

BMM ही तिन्ही अक्षर एकमेकांना जोडलेली दाखवली आहेत, आपण सर्व एकजूटीने, एकाच ध्येयाने हे संमेलन, हा सोहोळा आनंदाने साजरा करू हेच इथे सुचित केलं आहे.

अटलांटिक सीटी हा आपला बीएमएम २०२२ चा venue असणार आहे, त्यामुळे तो टीपिकल neon signs चा लुक लोगोमधे ठेवला आहे.

सर्व संकटांवर मात करुन मराठी अस्तित्वाच्या या सोहोळ्याची घोषणा आम्ही यशाची तुतारी फुंकून करीत आहोत.

सुविधा व्यवस्थापन प्रमुख श्री. अमोल पुरव ह्यांचा शब्दांमध्ये

हे चिन्ह म्हणजे मराठी साम्राज्य व संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान दर्शविणारी आपली मातृभूमी आणि हा मराठी सोहळा जिथे संपन्न होणार ती आपली अमेरिकन कर्मभूमी ह्या दोन्हींचा उत्कृष्ट मिलाप आहे.

फूड कमिटीच्या प्रमुख सौ. पूजा शिरोडकर ह्यांचा शब्दांमध्ये

२०२२ मध्ये अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्रमंडळाच्या लोगोमधील उगवता सूर्य उद्याची पहाट खूप सुंदर असणार आहे व करोना नंतरचे आपले आयुष्य सुरळीत होईल हा आशावाद दर्शवतो. लोगो मध्ये दर्शविलेले भगवे झेंडे व तुताऱ्या हे मराठी संस्कृतीचे निदर्शक आहेत. महाराष्ट्रातच नाही तर हिंदू धर्मातही हळदीकुंकवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. अमेरिका आणि कॅनडा यांचे राष्ट्रीय ध्वज यांचा लोगोमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिव्यांची रोषणाई व पताका ही सजावटअतिशय आकर्षक दिसतेय. तसेच आपली घोषणा “सोहळा अस्तित्वाचा” आपण करोनाच्या संकटावर मात करून पुन्हा एकदा समर्थपणे उभे राहू याची साक्ष पटवते.

प्रोग्रामिंगचे प्रमुख श्री. संदीप धरम ह्यांचा शब्दांमध्ये

उगवत्या सूर्यकिरणांच्या मांगल्याने मनातील अंधकार दूर करूया. दिंड्या पताकांच्या रोषणाईत, तुतारींच्या घोषात सजवूया मराठी संस्कृतीचा सोहळा. निसर्गासमोर नतमस्तक होऊन, अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील कॅसिनो सिटी मध्ये २०२२ चे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेश दणक्यात साजरे करूया.

मला पूर्णतः खात्री आहे एक नवीन आशा आणि नवीन उम्मेद घेऊन ये अधिवेशन आपण मिळून साजरे करू

चला तर मग तुम्ही आम्ही मिळून रचू एक नवा इतिहास आणि होऊ एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार

आम्ही सर्वच आपल्या भेटीसाठी उत्सुक आहोत. Welcome to BMM 2022