may update for bmm2022

may update for bmm2022नमस्कार मंडळी

बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे,

बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. अधिवेशनाचा पल्ला यशस्वीपणे गाठण्याच्या मार्गावरचा हा प्रवास सुकर होण्यासाठी सर्व समित्या आपापल्या परीने अथक परिश्रम घेत आहेत.

पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंतचा सगळा मार्ग नकाशांवर आखुन झाला आहे. कुठे ब्रेक घ्यायचा, कुठे डीटूअर घ्यावी लागणार, कुठे वेग कमी करावा लागणार, कुठे वेग वाढवावा लागणार आहे, याचे हे सूक्ष्म नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे.

समित्या आणि समित्यांचे स्वयंसेवक आमच्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. प्रत्येक स्वयंसेवकांना त्यांची भूमिका आणि जबाबदारी याची जाणीव आहे आणि ते आपापली जबाबदारी पूर्णतः सांभाळत आहे. प्रत्येक समितीने वेगवेगळ्या समितीशी सुसंवाद आणि समन्वय साधण्यास सुरवात केली आहे.

ह्या सर्व नियोजनामध्ये उच्च दर्जाची पातळी गाठण्याचे  उद्दिष्ट आणि ध्येय आमच्या समितीसमोर आहे. त्याकरता सर्व समितीचे प्रमुख इतर समितीच्या प्रमुखांशी चर्चा, विचार-विनिमयाद्वारे संपर्कात आहेत. मग तो सुविधा व्यवस्थापन प्रमुख श्री.अमोल पुरव आणि प्रोग्रामिंगचे प्रमुख श्री. संदीप धरम यांच्यातला समन्वय असो. फूड समिती प्रमुख सौ. पूजा शिरोडकर आणि सजावट समिती प्रमुख सौ गौरी चौधरी किंवा बँक्वेट समिती प्रमुख सौ. ज्ञानदा भिडे यांच्यातला समन्वय असू शकतो. मार्केटिंग आणि मीडिया प्रमुख श्री. राज पोफळे आणि सह-संयोजक श्री.अमर उरहेकर यांच्यातला विचार-विनिमय असू शकतो.

‘Day 0’ कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी सह-संयोजिका सौ. पुनीत मराठे यांनी स्वीकारली आहे आणि ‘CME’ प्रमुख सौ दीप्ती उतरणकर आणि उत्तरंग प्रमुख श्री नंदा पडते यांचा समित्यांसह नियोजन सौ. पुनीत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. त्याबरोबर, योग्य दराच्या हॉटेलच्या खोल्या पाहुण्यांसाठी नक्की करणे आणि करारा चा मसुदा तयार करण्यासाठी श्री अनिरुद्ध निवारगी आणि कोषाध्यक्ष श्री विहार देशपांडे यांनी या कामाला सुरवात केली आहे.

हे अधिवेशन तरुणांसाठी अविस्मरणीय असावे यासाठी युवा समितीच्या प्रमुख सौ. नीलम साळवी आणि टीम जोमाने कामाला लागली आहे.

बिझनेस कॉन्फरेन्स प्रमुख श्री. संजय शेट्ये यांनी बिझनेस कॉन्फरेन्स ची रुपरेखा आखून तयार केली आहे आणि या अधिवेशनात येणाऱ्या तरुणांना त्याचा कसा उपयोग होईल यावर नियोजन सुरू झाले आहे. विक्रेता व्यवस्थापन प्रमुख श्री. राहुल पवार यांनी बीएमएम एक्स्पोसाठी वेगवेगळ्या विक्रेत्यांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.

या अधिवेशासाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हे अधिवेशन “Go Green” असावे असे आमच्या समितीचे ठाम मत आहे. सध्याचे मराठी विश्व प्रेसिडेंट श्री. निरंजन देव आणि गो ग्रीन तज्ञ सौ. दर्शना गुप्ते यांनी या संदर्भांत पुढाकार घेतला आहे.

दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘एज्युकेशन समिट’ जो आपल्या विद्यार्थ्यांना भारत आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठाशी कनेक्ट होण्यास मदत करेल. यात आम्हाला श्री मुकुंद चोरघडे आणि श्री मुकुंद कर्वे मार्गदर्शन करीत आहे

या सर्व गोष्टींवर प्रकल्प व्यवस्थापक श्री. मुकुल डाकवाले यांचे बारकाईनं लक्ष आहे.

कोणत्याही यशस्वी अधिवेशनासाठी निधी संकलन ही एक महत्वाची बाब असते. निधी उभारणी प्रमुख श्री. विलास सावरगावकर यांनी कॉर्पोरेट देणगीदारांपर्यंत पोहोचण्यास सुरवात केली आहे. स्पॉन्सरशिपचे विविध पॅकेजस काय आहे, त्यात कोणत्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे  हे सगळे समजावून सांगण्यास  श्री. विलास सावरगावकर यांनी सुरवात केली आहे. आतापर्यंत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि लवकरच गोष्टी प्रत्यक्षात येतील अशी आशा आहे.

त्याबरोबर मी स्वतः उत्तर अमेरिकेतील वैयक्तिक देणगीदारांपर्यंत पोहचण्यास सुरवात केली आहे आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वैयक्तिक देणगीदाराच्या मोठ्या पाठिंब्यामुळे आम्ही जून महिन्यासाठी आमच्या निधी उभारणीचे उद्दीष्ट गाठण्याच्या मार्गावर आहोत. मात्र पुढील लक्ष्य तुमच्या सर्वांचा मदतीशिवाय गाठणं थोडंसं अवघड आहे. लवकरात लवकर आपली देणगी देऊन या कार्यात हातभार लावाल अशी आमची खात्री आहे.

पण सांगावंसं वाटतं की या सगळ्या नियोजनात गुणवत्तेत कुठेही तडजोड नाही, जे काही करायचं ते उत्तमच असेल. अधिवेशनाच्या संपूर्ण संयोजनापासून ते प्रत्यक्ष कार्यवाहीपर्यंतचा हा एक अद्भूत प्रवास आपल्या सगळ्यांना सर्वार्थाने समृद्ध करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

भारत आणि विशेषत: महाराष्ट्रातील कोविडची सद्यस्थिती विचारात घेऊन, काही कामात आम्ही आमचा वेग थोडा कमी केला आहे. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा आम्ही त्या कामांवर लक्ष केंद्रित करू आणि पुन्हा चर्चा सुरू करू. लोकांच्या भावनांबद्दल आम्ही संवेदनशील आणि जागरुक आहोत, कदाचित आपल्या कुटूंबातील किंवा आपल्या मित्रां मध्ये किंवा आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीवर कोविद संकटाचा परिणाम झाला असण्याची शक्यता असू शकतो याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे. माझी आणि माझ्या बीएमएम टीमच्या प्रार्थना भारत आणि महाराष्ट्रातील जनते बरोबर आहे आणि आशा करतो की आपण सगळे लवकरच या संकटावर मात करू आणि या परिस्थितीतून मुक्त होऊ.चला तर मग पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया एका नवीन आशेने, आपल्या अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी २०२२ संयोजक