नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

मंडळी,आपल्या मराठीत शब्दांची महती सांगणारी अनेक काव्ये होऊन गेलीत. ‘आम्हा घरी धन शब्दांची रत्ने’ असे तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे खरंच,शब्दांच्या या धनाची महती सध्याच्या करोना काळात सर्वार्थाने कळली आहे. कमावलेली सारी सुखे एकीकडे आणि दिलासा देणारा एक शब्द एकीकडे. महीनोंमहीने एकमेकांना न भेटू शकलेले प्रियजन,मित्र यांना बांधून ठेवण्याचं किंबहुना अधिक जवळ आणण्याचं काम ही शब्दच तर करताहेत नाही का ! शब्दांचे हे धन वेगवेगळ्या माध्यमातून वाटत राहण्याचे आमचे व्रतही अखंड सुरू आहे.

मंडळी,BMM 2022 अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे ही एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.जागा निश्चित झाली,तयारी सुरू झाली आता पुढचं पाऊल म्हणजे कार्यक्रमांची निवड.उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवावे हा आमचा प्रयत्न आहे.त्यासाठी जगभरातील कलावंतांना प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन आम्ही करीत आहोत.

प्रस्ताव पाठवण्याची लिंक: https://bmm2022.org/submit-program-proposal/
प्रस्ताव स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे: १५ जून २०२१

सध्या भारतामध्ये करोंनाची आलेली दुसरी लाट चिंताजनक रूप घेते आहे असं दिसतंय.पण काळजी करू नका. विझताना मोठ्या होणाऱ्या वातीप्रमाणेच करोंनाही आपल्या शेवटच्या टप्प्यात आला आहे असं मानायला हरकत नाही. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि एकमेकांशी भरभरून बोलत रहा !

आपली नम्र ,

विद्या जोशी

अध्यक्ष्या, बृहन महाराष्ट्र मंडळ

Vidya.joshi@bmmonline.org