सोहळा अस्तित्वाचा: बीएमएम २०२२ स्मरणिका-आवाहन

सोहळा अस्तित्वाचा: बीएमएम २०२२ स्मरणिका-आवाहन

नमस्कार,

 

'मराठी विश्व, न्यू जर्सी' (स्थापना - १९७८) आणि 'बृहन्  महाराष्ट्र मंडळ' (स्थापना - १९८१) यांच्यातर्फे होणार्‍या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसिद्ध होणार्‍या स्मरणिकेसाठी स्वत:चे अप्रकाशित मराठी साहित्य, कथा, कविता, निबंध, माहितीपर लेख, संकीर्ण उपयुक्त माहिती किंवा स्वत: काढलेली व्यंगचित्रे, रंगचित्रे, रेखाटने पाठवण्याचे आवाहन आम्ही सर्व मराठी बांधवांमध्ये असलेल्या लेखक, कवी, चित्रकार यांना करीत आहोत.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून जगभरात सर्वांनाच अनपेक्षित संकटाला तोंड द्यावे लागले आणि रोजचे सुरळीत सुरू असलेले जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले. त्यामुळे आपले २०२१ मध्ये होणारे अधिवेशन २०२२ मधे करण्याचे ठरले. ह्या संकटाशी लढत आपण सर्वजण हळूहळू बाहेर पडत आहोतच. त्या लढ्याला मानवंदना म्हणून आम्ही ह्या अधिवेशनाची संकल्पना ‘सोहळा अस्तित्वाचा अशी निवडली आहे. ह्या धर्तीवर आपणाकडून साहित्य येणे अपेक्षित आहे. सकारात्मक संदेश असलेल्या आपल्या कथा, स्वानुभव, कविता आणि इतर साहित्य सर्वांना स्फुरण देईल यात शंकाच नाही. तसेच आपली मराठी भाषा, संस्कृती यांचे सुद्धा एक विशेष अस्तित्व आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्या सर्वांसाठी काही विषयांची उदाहरणे खाली नमूद करीत आहोत.

  • विषयाला धरून स्वरचित कथा, कविता, आठवणी, अनुभव
  • मराठी भाषेच्या गौरवकथा, मराठी संस्कृती, परंपरा, संस्कार
  • विविध प्रांतांतील पारंपारिक खाद्यपदार्थ
  • मराठी साहित्यिक आणि त्यांचे योगदान
  • विपरीत परिस्थितीतून केलेले यशस्वी मार्गक्रमण
  • व्यवसायाव्यतिरिक्त इतर छंद, आवडीनिवडी जोपासून समाजात आणलेला बदल
  • सद्य परिस्थिती ओळखून स्वतः मधे, व्यवसायामधे केलेले बदल
  • समाजसेवेची संधी आणि त्यातून मिळालेली शिकवण
  • शांता शेळके, बाबासाहेब पुरंदरे, भीमसेन जोशी, वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष लेख
  • प्रवास वर्णन, महाराष्ट्रातील/जगभरातील नक्की बघावी अशी प्रेक्षणीय स्थळं
  • आरोग्य संपदा: तज्ञांकडून जीवनशैली, संतुलित आहार, मानसिक तणाव आणि इतर सर्वसामान्य आरोग्याविषयी माहिती

ह्या व्यतिरिक्त आपल्या आवडीच्या विषयांचे सुद्धा स्वागत आहे.

* अपेक्षित साहित्य व शब्दमर्यादा: कथा/लेख (१००० शब्द), कविता (२० ओळी), पाककृती (३०० शब्द) - निवडलेल्या योगदानकर्त्याचा फक्त एकच लेख/गोष्ट/कविता/चित्रकला प्रकाशित केली जाईल.

* युवा साहित्य: वरील सर्व विषय अथवा मुलांच्या आवडीच्या कुठल्याही विषयांचे स्वागत आहे.

We are excited to invite teens and youth to contribute for ‘Smaranika’. Please send your original unpublished work such as short-stories, poems, articles, recipes, in Marathi or English as well as drawings, paintings, cartoons, photos, etc.

Last date to send your submissions is April 15th 2022.

साहित्य पाठवण्याचे नियम आणि मुदत

१. साहित्य आपले स्वत:चे असावे. इतरत्र कुठेही प्रकाशित केलेले अथवा समाज माध्यमांवर (social media) प्रसिध्द झालेले नसावे. रुपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकाच्या नावाचा उल्लेख आणि परवानगी आवश्यक आहे.

२. आपल्या साहित्यात कुठलेही चित्र (Image) वापरायचे असेल तर ते png format मधे पाठवावे आणि Google, आंतरजाल (Internet), इत्यादी वरून घेतलेले असल्यास त्याची नोंद करावी. (to avoid plagiarism). Copyright requirement असल्यास आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.

३. साहित्याच्या निवडीत समितीचा निर्णय अंतिम राहील. निवडलेल्या साहित्यात मोजकेपणा, सुस्पष्टपणा आणि शुद्धलेखन यांच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याचा हक्क समितीला आहे. कृपया विवादात्मक व आक्षेपार्ह विषय टाळावे.

४. साहित्याबरोबर स्वत:चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता (E-Mail address) पाठवणे आवश्यक आहे.

५. उत्तर अमेरिकेतल्या साहित्याला प्राधान्य दिले जाईल.

६. साहित्याचा/कलाकृतीचा मोबदला अथवा मानधन दिले जाणार नाही, ह्याची नोंद घ्यावी.

७. साहित्य, जाहिराती आणि शुभेच्छा संदेश पाठवण्याची अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२२.

 

मुखपृष्ठ: 'सोहळा अस्तित्वाचा' ह्या विषयावर आधारित चित्र अथवा रेखाटन ८.५” X११” या स्वरूपात असावे. त्यात आवश्यक ते बदल करण्याचे हक्क स्मरणिका समितीकडे असतील.

शब्द गुंफण गोष्टी: खालीलपैकी जास्तीतजास्त शब्द वापरून तुमच्या कल्पनेतून १०-१२ वाक्यात एक लघुकथा लिहून पाठवणे अपेक्षित आहे. आपल्या ‘गुंफण गोष्टी’ वाचायला आम्ही उत्सुक आहोत!

(उन्माद, श्री, पंचपक्वान्न, झुंजूमुंजू, व्यासंग, चिवचिवाट, अभिजात, निर्मिती, समृद्धी, आविर्भाव)

 

साहित्य पाठवायचा ई-मेल पत्ता:

smaranika@bmm2022.org

Please fill out the below form and upload your articles and illustrations/images/pictures to the folder within the form

https://bmm/smaranika_submission_form.org

जाहिराती आणि शुभेच्छा संदेश देण्यासाठी संपर्क:

Nitin Ashtekar (Phone# 908-392-5152)
nitin.ashtekar@bmm2022.org

धन्यवाद!

स्मरणिका २०२२ समिती