स्वाद न्यू जर्सीचा- सोहळा अस्तित्वाचा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा                          जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा……. शिवतेजाच्या उज्ज्वल प्रकाशाने उजळून गेलेल्या, तसेच थोर संत-पंत, कवी, लेखक, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिकांची दैदिप्यमान, उज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. ह्याचबरोबर आपले सणवार, प्रांतानुसार विभागलेली जातीरचना, वेशभूषा,...

दिवाळी 2021

नमस्कार मंडळी,   ‘या देवी सर्व भूरेषू शक्तिरूपेण संस्थिता’ असे म्हणत सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे पर्व अर्थात नवरात्र संपता संपताच वेध लागतात ते दिवाळीचे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतलेल्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी ! ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’. वर्षभर ज्याची चातकाच्या आतुरतेने वाट पहिली जाते असा सण  म्हणजे...

November update by Vidya Joshi

नमस्कार मंडळी,  गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण एक स्वप्न घेऊन चाललो आहोत.२०२२ च्या बृ.म.मं.च्या अधिवेशनाचं.तेव्हापासून मनातली प्रत्येक वाट  स्वप्नामधील गावा अर्थातच अटलांटिक सिटीकडेच धाव घेत असते.स्वप्नातली ही भरारी प्रत्यक्षा त.आणण्यासाठी वास्तवाचं भान असणारं सशक्त नियोजन हवे.यजमान न्यू जर्सीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात आपल्याला ते लाभले आहे याची जाणीव नुकत्याच अधिवेशन स्थळाला दिलेल्या भेटीत...

गणेशोत्सव 2021

नमस्कार मंडळी,  श्रावण संपत आला की आपसूकच मन गणरायाच्या आगमनाची वाट बघायला लागतं.मनातल्या मनात आपली आरास करून झाली  असते.अजून बाजारातही न आलेली गणेशाची मूर्ती आपल्या मनातल्या देखाव्यात स्थानापन्न झालेली असते.  नैवेद्याच्या फर्माईशी तर घरातून आधीच सुरू झालेल्या असतात. गणपतीचे आगमन होणार या नुसत्या कल्पनेनेच  मनाचा कोपरान् कोपरा उजळलेला असतो. यंदाच्या...