स्वाद न्यू जर्सीचा- सोहळा अस्तित्वाचा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा                         जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…….शिवतेजाच्या उज्ज्वल प्रकाशाने उजळून गेलेल्या, तसेच थोर संत-पंत, कवी, लेखक, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिकांची दैदिप्यमान, उज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. ह्याचबरोबर आपले सणवार, प्रांतानुसार विभागलेली जातीरचना, वेशभूषा, चालीरीती, बोलीभाषा...