नमस्कार,

BMM २०२२ च्या अधिवेशनानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्मरणिका’ ह्या मासिकाअंतर्गत आम्ही ‘साहित्य शताब्दी’ हा एक अनोखा उपक्रम घेऊन येत आहोत. आदरणीय कवयित्री श्रीमती शांताबाई शेळके आणी जेष्ठ कविवर्य श्री. वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आम्ही आपल्याला त्यांनी रचलेल्या व तुमच्या आवडीच्या एका कवितेचे वाचन करण्यास आमंत्रित करीत आहोत.

ह्या उपक्रमाची कल्पना अशी की BMMच्या ह्या भव्य संमेलनानिमित्त सर्व मराठी रसिकांना उत्तर अमेरिकेतील विविध क्षेत्रातील म्हणजेच साहित्य, काव्य, नाट्य, संगीत, शक्षैणिक, इत्यादी साहित्यात रुची असलेल्या मान्यवरांकडून उत्तमोत्तम कविता ऐकायला मिळतील. शिवाय, हा अमुल्य ठेवा BMMच्या YouTube चॅनेल वर कायमस्वरुपी सग्रंही राहील आणी ह्याचा आनदं आपल्या सर्वांना घेता येईल. हीच असेल आपल्या सर्वांकडून शांताबाई आणि वसंत बापट यांना मानवदंना!