committee

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणं सर्वांना २०२१ या नवीन वर्षाच्या आगमनाची जेवढी उत्सुकता आणि आनंद आहे, त्याहून अधिक २०२० वर्ष संपल्याचा जास्त आनंद आहे.

सध्याच्या Pandemic मुळे आपल्या सगळ्यांचे आयुष्य बऱ्यापैकी विस्कळीत झाले आहे. मनात इच्छा असून ही आपल्याला आपल्या मित्र परिवार बरोबर एकत्र सण साजरा करता येत नाही, एकमेकांना भेटता येत नाही. ही पण वेळ जाईल निघून आणि एक सुंदर आशावाद घेऊन नवीन पहाट उजाडेल २०२१ या वर्षात. २०२० चं वर्ष संपत आलं आणि दर वर्षीप्रमाणे लोक कामाला सुट्टी देऊन नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले. येणारे नवीन वर्ष एक नवीन उमेद, एक नवीन आशा घेऊन येणार आणि आयुष्य पुन्हा सुरळीत होणार असा आशावाद निर्माण झाला आहे. म्हणूनच न्यू जर्सीत एक वेगळीच लगबग जाणवत आहे आणि ती म्हणजे बीएमएम २०२२ ची पूर्वतयारी. मागील २-३ महिन्यांत समितीच्या सदस्य आणि स्वयंसेवक यांचा उत्साह व परिश्रमांनी अधिवेशनाच्या तयारीला योग्य आणि सकारात्मक दिशा मिळाली आहे.

दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आपली वेबसाइट bmm2022.org जाहीर केली. दसर्‍याच्या निमित्ताने आम्ही बीएमएम २०२२ चा स्वागत व्हिडिओ देखील जाहीर केला. श्री. सचिन खेडेकर यांनी मराठी विश्वाला आपला आवाज दिला याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या व्हिडिओच्या संकल्पनेचे श्रेय आमच्या सह-संयोजक श्री. अमर उरहेकर यांना जाते.

त्या बरोबर आम्ही घोषवाक्य आणि प्रतीकचिन्ह स्पर्धासुद्धा सुरू केली. घोषवाक्य आणि प्रतीकचिन्ह स्पर्धा, मार्केटिंग आणि मीडिया प्रमुख श्री. राज पोफळेसौ. स्नेहल वझे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतूनच नव्हे तर परदेशातूनही स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांप्रमाणेच आम्ही देखील स्पर्धेच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहोत. लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल. या निमित्ताने आम्ही डिजिटल मार्केटिंग ची चाचणी घेतली. फेसबुकद्वारे जगभरच्या लोकांपर्यंत बीएमएम २०२२ अधिवेशनाची माहिती पोहचवली. अधिवेशनाची माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी. कृपया भेट द्या https://www.facebook.com/bmm2022nj. या फेसबुक पेजला ’Like’ करावे ही विनंती.

अधिवेशनाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॉन्व्हेंशन सेंटर. अगदी प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतही, न्यू जर्सीच्या टीम ने गेल्या २ महिन्यांत तीन वेळा अधिवेशन केंद्रास भेट दिली. सुविधा व्यवस्थापन प्रमुख श्री. अमोल पुरव यांच्या सर्जनशील नेतृत्वात टीमने सुविधेसाठी उत्कृष्ट नियोजन व मांडणी केली. प्रोग्रामिंगचे प्रमुख श्री. संदीप धरम यांनी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यक्रमासाठी ऑडिओ, व्हिज्युअल आणि स्टेजच्या आवश्यकतेची मौल्यवान माहिती गोळा केली. फूड कमिटीच्या प्रमुख सौ. पूजा शिरोडकर यांनी प्रत्येक दिवसाचे जेवणाचे वेळापत्रक नियोजित केले आणि आवश्यक श्रम अंदाजाची माहिती गोळा करून योजना आखून देण्याचे काम केले. जेव्हा आपण अधिवेशनाबद्दल विचार करतो तेव्हा भरपूर निधीची गरज असते. समितीने निधी उभारणीच्या महत्त्वपूर्ण कामांवर काम सुरू केले आहे. निधी उभारणी प्रमुख श्री. विलास सावरगावकर आणि कोषाध्यक्ष श्री. विहार देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली निधी उभारणीच्या कामांना वेग आला आहे. कुटुंब आणि मित्रांमध्ये निधी जमा करण्यासाठी अनेक देणगीदारांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. आपला मराठी वारसा, संस्कृती आणि अभिमान जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या नवीन पिढीला आपल्या महान संस्कृतीत हस्तांतरित केले पाहिजे. मला खात्री आहे की एकत्रितपणे आपण मिळून हे लक्ष्य साध्य करू. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत तुम्ही सर्वजण कराल अशी आमची खात्री आहे.

संभाव्य आणि इच्छुक देणगीदारांनी कृपया vilas.savargaonkar@bmm2022.org वर संपर्क साधा

कृपया पुढील पानावर आमचे “Donation Package” पाहावे.

आमच्या सह-संयोजिका सौ. पुनीत मराठे आम्हाला विविध कराराचा आढावा घेण्यासाठी आणि मौल्यवान अभिप्राय देण्यात मदत करत आहेत. त्याबरोबरच, त्यांनी ‘Day 0’ कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रकल्प व्यवस्थापक श्री. मुकुल डाकवाले सर्व समित्यांमध्ये समन्वय साधण्यास आणि सर्व समित्यांसाठी रोडमॅपची योजना आखण्यात मदत करीत आहेत.

आम्हाला आशा आहे की अधिवेशनात बरेच तरुण आकर्षित होतील आणि त्यांना भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा समतोल अनुभवायला मिळेल. हे अधिवेशन तरुणांसाठी अविस्मरणीय असावे यासाठी युवा समितीच्या प्रमुख सौ. नीलम साळवी काम करीत आहेत.

आमच्या समितीला सतत पाठिंबा, मार्गदर्शन व मौल्यवान माहिती प्रदान केल्याबद्दल मी बीएमएम टीम आणि बीएमएमच्या अध्यक्षा सौ.विद्या जोशी यांचे आभार मानू इच्छितो.

अधिवेशनात आपणा सर्वांना एक संस्मरणीय अनुभव देण्यासाठी माझी संपूर्ण टीम जोरदार प्रयत्न आणि मेहनत

करीत आहे.

चला तर मग भेटूया ऑगस्ट ११-१४ २०२२ ला अटलांटिक सिटी, न्यू जर्सी मध्ये.

तुम्ही आम्ही मिळून रचू एक नवा इतिहास आणि होऊ एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार

Welcome to BMM 2022

प्रशांत कोल्हटकर

न्यू जर्सी २०२२ संयोजक

committee