नमस्कार मंडळी,

  सध्या आपण सारेच ‘कोविड -१९’ मुळे निर्माण  झालेल्या जागतिक महामरिशी लढत आहेत. एकीकडे आपण आपापल्या कुटुंबाचे स्वास्थ्य जपत आहोत तर दुसरीकडे आपापली कामे ‘इंटरनेट’ च्या माध्यमातून करत आहोत आणि आपापल्या देशात आर्थिक व्यवस्थेला सहकार्य करीत आहोत. निश्चितच आपले काही बांधव आणि भगिनी देशासाठी अत्यंत आवश्यक सुविधा पुरवत आहेत आणि प्रत्यक्ष रीतीने ‘कोरोना’ ला सामोरं जाऊन झुंज देत आहोत आणि आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत – त्या सर्वांचेच विशेष कौतुक आणि मन:पूर्वक आभार.

          खरं तर, सध्या साऱ्या जगात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. यातच, २० जानेवारी रोजी जोसोफ बायदेन यांचा अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपत विधी झाला आणि अमेरिकेत तथा आंतरराष्ट्रीय राजकारणात अजून एक अध्याय सुरू झाला. अखंड भारत देशात कार्यत पंतप्रधान मोदी यांचे सरकार सुद्धा भारताच्या इतिहासात एक महत्वाचं पान लिहीत आहेत. अनेक स्थानिक, अंतरराष्ट्रीय उपक्रम आणि घटना घडत असतांना २६ जानेवारी रोजी भारतीय घटक राज्याचा ७२ वा ‘प्रजासत्ताक दिन’ भारताची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न होत आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक देशाच्या वैभवाचे, शक्तीचे, प्रगतीचे आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करणारी फेरी दिल्लीतील विजय चौकातून काढून ‘ प्रजासत्ताक दिन’ अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. नुकतंच आस्ट्रेलिया येथे अगदी अलीकडेच पार पडलेल्या ‘ गावस्कर- बॉर्डर’ चषकाच्या, ५ दिवसांच्या खेळाच्या साखळी प्रतियोगितेत, अजिंक्य राहणे या आपल्य मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, युवा भारतीय संघाने, मालिका जिंकून जे दैदिप्यमान यश मिळवलं ते भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्या सारखं आहे. भारताचे पंतप्रधान मादी यांनीही अजिंक्य राहणे आणि भारतीय संघाचे विशेष कौतुक केले आहे.

“विजयी साक्षात्कार”

महा रथींची गैर हजेरी, समोर संकट ऊभे
संघ युवांच सज्ज जाहला, नेता ‘ अजिंक्य’ शोभे

शांत होते वीर अपुले, हवा निश्चित वादळी
अटी तटीच्या सामन्यासह, लक्ष होती साखळी

संघ युवांचा लढवैय्यांचा, उभा ठाकला रणी
अटी तटीच्या सामन्यासह, लक्ष होती साखळी

कितीक जनांना हवेहवेसे, गुपीत जाणले मनी
गाबा मधल्या मैदानावर, लक्ष साधले त्यांनी

कांगारूंवर वर्चस्व गाजवून, रोवला झेंडा लक्षा – पार
युवा – शक्तिने संयम राखून, केला विजयी साक्षात्कार !

आपणा सर्वांचेच भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !

आपले,
बीएमएम २०२२ अधिवेशन मंडळ