नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा एक पुढील आढावा घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे.

सरता ऋतुमागूनी ऋतू

झरा वाहे चैतन्याचा

आगमन झाले वसंताचे

करीत उधळण रंगांचा

हिवाळ्याला निरोप देऊन रंगांची बरसात करत नुकताच होळीचा सण जल्लोषात पार पडला आहे. वसंत ऋतूच्या बहारदार आगमनाने वातावरणात घडलेले सुखद बदल आपल्या सर्वांच्या मनाला उल्हासीत करणारे आहेत. झाडांना फुटलेली कोवळी हिरवीगार पालवी आणि नव्याने उमलणाऱ्या फुलांचा सुगंध ह्यांनी सारा आसमंत भारून टाकला आहे. त्यामुळे तनमनात उत्साह जाणवला तर त्यात काही नवल नाही.   

 त्यातच बीएमएम २०२२ अधिवेशन म्हणता म्हणता केवळ महिने दूर आहे म्हणूनच समस्त न्यू जर्सीकरांमधे प्रचंड उत्साहाचे वारे वाहत आहेत. २०० स्वयंसेवकांची टीम गेल्या १८ महिन्यांपासून हे संमेलन सर्व उपस्थितांसाठी नेत्रदीपक आणि अविस्मरणीय बनवण्याच्या एकाच ध्येयाने, सर्व अडचणी आणि आव्हानांना तोंड देत खूप मेहनत घेत आहेत. सर्व समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. अनेक बैठका, समितीमधील परस्पर समन्वय, आराखडा अंतिम करण्याचे काम सर्व पातळीवर वेगाने सुरू आहे. आता आम्हाला फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आणि मला आशा आहे की तुम्ही तुमचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांसह अधिवेशनाला जरूर उपस्थित रहाल. 

 उत्तर अमेरिकेतील कलाकारांना कलागुण पेश करायची संधी देणे हे ह्या संमेलनाचे एक उद्दिष्ट आहे. संगीत, नृत्य, नाट्य, विनोद, साहित्य अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांचे प्रदर्शन करण्यासाठी ह्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन उपलब्ध करून देते 

या अधिवेशनात तुम्हाला उत्तर अमेरिकेतील कलाकारांच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. इथल्या विविध राज्यातून निवडलेल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी तुमच्यासाठी असेल 

कार्यक्रम
न्यू जर्सी
HEY USतित्व – Opening Ceremony
कॅलिफोर्निया (लॉस आंजल्स)
अंतरीच्या गूढगर्भी
मॅसॅच्युसेट्स
रंगश्वास
अनेक राज्यांनी एकत्र येऊन सादर केलेले
स्वयंप्रकाशी स्वरतारे
कॅलिफोर्निया
हास्य धबधबा
मिशिगन (डेट्रॉईट)
शाबरी
मेन
Mindful Living
इलिनॉय
Importance of having Will
न्यू जर्सी
स्वर आले फुलुनी
१०
नॉर्थ कॅरोलिना
महाअंताक्षरी
११
न्यू जर्सी
कॅम्प वळिवडे
१२
व्हर्जिनिया
जरी पटका
१३
इलिनॉय (शिकागो)
ऐंका रंगदेवते तुझी कहाणी
१४
कॅलिफोर्निया
रसिकांचा हृदयस्थ तारा
१५
टेक्सास
शेक्सपियर एक्सपेरिमेंट
१६
लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया)
अंतरीच्या गूढगर्भी
१७
अनेक राज्यांनी एकत्र येऊन सादर केलेले
मराठी अस्तित्व
१८
टेक्सास
स्वरलय विरासत
१९
न्यू जर्सी
कला, कलाकार आणि कोविड

अधिक माहितीसाठी https://bmm2022.org/north-american-programs/   आणि https://bmm2022.org/indian-programs/    संकेतस्थळाला नक्की भेट द्या. 

गेल्या महिन्याच्या वृत्तामधे आपल्याडे केअरह्या सुविधेबद्दल मी उल्लेख केला होता. ते १३ वयोगटातील मुलांकरताडे केअरआवश्यक सोयींनी परिपूर्ण असेलच पण त्यामधे मुलांचे मनोरंजनाचे आणि त्यांना गुंतवून ठेवणारे उपक्रम असणार आहेत शिवाय मराठी संस्कृती जोपासण्याचा भाग म्हणून मराठी कार्यशाळेचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी विशेष तसदी घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पालकांना निर्धास्त मनाने अधिवेशनाची मजा लुटता येणार आहे. 

      साधारण ३० ते ५०वयोगटातील कुटुंब आणि त्यांची २० वयोगटातील मुले ह्यांचा विचार करुन आम्ही खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जेणेकरुन आमच्या किशोरवयीन आणि तरुण पिढीला अधिवेशनात गुंतवून ठेवता येईल. 

  • १४ ते १८ वयोगटासाठी मुलामुलींसाठी क्रूझ आणि १८ त्यावरील वयोगटासाठी स्वतंत्र क्रूझ नोंदणीचा ​​भाग म्हणून समाविष्ट केली आहे. 
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची नृत्य कार्यशाळा 
  • डान्स इंडिया डान्स फायनलिस्ट स्वरालीची नृत्य कार्यशाळा 
  • जादूगार रघुवीर यांचा मॅजिक शो 
  • सत्यजित पाध्ये ह्यांच्या बोलक्या बाहुल्या 
  • डीजे नाईट 
  • पॉल वर्गीस कॉमेडी शो 
  • कॅलिफोर्नियातील १२ वर्षांच्या शलाका डोळसचा हास्य धबधबा 
  • व्हिडिओ गेम स्पर्धा 
  • स्पीड डेटिंग 

आमची तिकिटे आणि देणगीदारांची पॅकेजेस वेगाने विकली जात आहेत. पण तिकीट बुक करण्यासाठी आणि तुमची नोंदणी पूर्ण करण्यासाठी अजून वेळ आहे. जर तुम्हाला अधिक चांगल्या जागा हव्या असतील तर तुम्ही आमची देणगीदारांसाठी खास पॅकेजेस खरेदी करू शकता आणि चांगल्या जागा लॉक करू शकता. 

अधिक माहितीसाठी https://bmm2022.org संकेतस्थळाला नक्की भेट द्या. 

जसा प्रत्येक उगवता दिवस आशा-अपेक्षांची, स्वप्नांची नवकिरण घेऊन अवतरतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीचे अनेक पल्ले यशस्वीपणे पार करून आगेकूच करतो आहे, कार्यकर्त्यांची उमेद व्दिगुणित करतो आहे आणि त्याचा आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो. 

 Welcome to BMM 2022 

प्रशांत कोल्हटकर 

न्यू जर्सी  

बीएमएम २०२२ संयोजक