California
Shalaka Dolas
हास्य धबधबा’ ही एक प्रासंगिक विनोदावर आधारित नाट्यछटा व एकपात्री प्रवेश यांची शृंखला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील घडणाऱ्या घटना, व्यक्तीचित्रे यांच्यावर आधारित हा कार्यक्रम प्रत्येकाला आपलासा वाटतो. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शंकर पाटील इत्यादी दिग्गजांनी आपल्यासमोर मराठी कथाकथनाची अद्वितीय आणि उत्तुंग परंपरा ठेवली आहे. त्यांच्या कथाकथनांनी साऱ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनाचे गाभारे भारून टाकले आहेत. स्टँडअप कॉमेडीच्या सध्याच्या युगात मराठी स्टँडअप कॉमेडी तशी नवखीच आहे. त्यात अनेक नवनवे प्रयोग होत असले तरी निखळ विनोदी मराठी स्टँडअप कॉमेडी, जी आपण आपल्या कुटुंबातील साऱ्या सदस्यांसह पाहून आनंद घेऊ शकतो अशी, सापडणे कठीणच आहे. ‘हास्य धबधबा’ हा कार्यक्रम म्हणजे पु. ल., व. पु., शंकर पाटील या दिग्गजांकडून प्रेरित झालेला एक निखळ आणि शुद्ध विनोदी कार्यक्रम आहे.
लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्येंत प्रत्येकाला तो कार्यक्रम आपलासा वाटतो. रसिकांचे चित्त वेधून घेणारा, त्यांचे मन हलकेफुलके व ताजेतवाने करणारा, निखळ आनंद देणारा आणि नाविन्यपूर्ण असा हा कार्यक्रम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, व्यक्तीचित्रे यांच्यावर आधारित नाविन्यपूर्ण लेखन, अनोखे आणि दर्जेदार सादरीकरण, यांचा तो उत्त्तम मिलाप आहे.हास्य धबधबा’ ही एक प्रासंगिक विनोदावर आधारित नाट्यछटा व एकपात्री प्रवेश यांची शृंखला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील घडणाऱ्या घटना, व्यक्तीचित्रे यांच्यावर आधारित हा कार्यक्रम प्रत्येकाला आपलासा वाटतो. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शंकर पाटील इत्यादी दिग्गजांनी आपल्यासमोर मराठी कथाकथनाची अद्वितीय आणि उत्तुंग परंपरा ठेवली आहे. त्यांच्या कथाकथनांनी साऱ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनाचे गाभारे भारून टाकले आहेत. स्टँडअप कॉमेडीच्या सध्याच्या युगात मराठी स्टँडअप कॉमेडी तशी नवखीच आहे. त्यात अनेक नवनवे प्रयोग होत असले तरी निखळ विनोदी मराठी स्टँडअप कॉमेडी, जी आपण आपल्या कुटुंबातील साऱ्या सदस्यांसह पाहून आनंद घेऊ शकतो अशी, सापडणे कठीणच आहे.
‘हास्य धबधबा’ हा कार्यक्रम म्हणजे पु. ल., व. पु., शंकर पाटील या दिग्गजांकडून प्रेरित झालेला एक निखळ आणि शुद्ध विनोदी कार्यक्रम आहे. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्येंत प्रत्येकाला तो कार्यक्रम आपलासा वाटतो. रसिकांचे चित्त वेधून घेणारा, त्यांचे मन हलकेफुलके व ताजेतवाने करणारा, निखळ आनंद देणारा आणि नाविन्यपूर्ण असा हा कार्यक्रम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, व्यक्तीचित्रे यांच्यावर आधारित नाविन्यपूर्ण लेखन, अनोखे आणि दर्जेदार सादरीकरण, यांचा तो उत्त्तम मिलाप आहे.