नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा एक पुढील आढावा घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे.

जसजसे अधिवेशन जवळ येत चालला आहे तसतसे केवळ न्यू जर्सीमध्येच नव्हे तर संपूर्ण उत्तर अमेरिकेत अधिवेशनासाठी उत्साह आणि उत्कंठा वाढत चाललेली आहे. बीएमएम २०२२ अधिवेशनासाठी सुरू असलेल्या तयारीबद्दल आम्हाला संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायाकडून ठोस पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे आणि समुदाय अधिक अपडेट्स ऐकण्यासाठी उत्सुक आहे.

विविध समित्यांचे अनेक नियोजित उपक्रम अंमलबजावणीच्या टप्प्यात येऊ लागले आहेत. कार्यक्रम अंतिम झाले आहेत, व्हिसा याचिका मंजूर होत आहेत. फूड मेनू आणि फूड लॉजिस्टिक अंतिम झाले आहे. तरुण आणि लहान मुलांसाठी अॅक्टिव्हिटी लाइन अप निश्चित करण्यात आली आहे. उपस्थितांचे स्वागत कसे करायचे याची तयारी जोरात चालू आहे, जेणेकरून हे अधिवेशन सर्वांसाठी एक सुखद आणि अद्भुत अनुभव असेल

विविध स्पर्धांचे आता दुसऱ्या फेरीत मूल्यांकन सुरू झाले आहे. मागच्या महिन्यातच आम्ही ढोल ताशा स्पर्धेची घोषणा केली आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, आम्हाला उत्तर अमेरिकेतून बरेच ढोल ताशा पथक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच आम्ही फोटोग्राफी आणि ड्रॉइंग स्पर्धा जाहीर केल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यात बीएमएम टीमने विविध मंडळांना भेटी दिल्या आणि विविध मराठी मंडळांच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायापर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांना संमेलनास उपस्थित राहण्याचे वैयक्तिक निमंत्रण देणे हा या भेटीचा एकमेव उद्देश होता.

आम्ही खालील मंडळांना भेट दिली डेट्रॉईट, अल्बानी, न्यू इंग्लंड, डेलवेअर आणि फिलाडेल्फिया,

उत्तर अमेरिकेतील संपूर्ण समुदायाच्या वतीने, फिलाडेल्फिया मंडळाला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो

आमची सिल्व्हर पॅकेजेस आणि बँक्वेट डिनर विकले गेले आहे, जर तुम्ही मुख्य अधिवेशनासाठी नोंदणी केली असेल आणि आमच्या डे 0 इव्हेंटसाठी (CME, उत्तररंग, बिझनेस कॉन्फरन्स किंवा होलिस्टिक वेलनेस फोरम) नोंदणी करायला विसरला असाल, तर ते विकले जाण्यापूर्वी तुम्ही नोंदणी करू शकता

अधिक माहितीसाठी https://bmm2022.org संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

आमची सर्व तयारी अंतिम टप्यात आहे आणि ती पुढच्या काही आठवड्यात पूर्ण होतील, आम्ही न्यू जर्सीकर तुमच्या स्वागत साठी उत्सुक आहोत आणि ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान अटलांटिक सिटीमध्ये तुमच्या सर्वांचे मोकळ्या मनाने स्वागत करू पाहत आहे.

जसा प्रत्येक उगवता दिवस आशा-अपेक्षांची, स्वप्नांची नवकिरण घेऊन अवतरतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीचे अनेक पल्ले यशस्वीपणे पार करून आगेकूच करतो आहे, कार्यकर्त्यांची उमेद व्दिगुणित करतो आहे आणि त्याचा आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो.

Welcome to BMM 2022

प्रशांत कोल्हटकर

न्यू जर्सी

बीएमएम २०२२ संयोजक