INDIA EVENT

सारखं काहीतरी होतंय

When
Key Performer

Prashant Damle & Varsha Usgaonkar
Writing and Direction - Sankarshan Karhade

Experience once again after 36 years, Varsha Usgaonkar and Prashant Damale’s new core play, “सारखं काहीतरी होतंय” (Something like this is happening).

सारखं काहीतरी होतय ही घराघरातील गोष्ट आहे .घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासून, स्वतः च्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळ बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतातच. पण मुलं मोठी झाल्यानंतर  त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. जो दृष्टिकोन स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोना पेक्षा भिन्न असतो. ह्या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि प्रामुख्याने   आपापसातल्या संवादावर कायम परिणाम होत असतो. ह्याच्यावर उपाय म्हणुन दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि पॉईंट ऑफ व्हीव ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात. आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं. हीच ह्या नाटकाची गोष्ट आहे.