नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा एक पुढील आढावा घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे.
मला अशी आशा आहे कि तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला कार्यक्रम नक्कीच निश्चित केला असेल आणि तुमच्यापैकी बहुतेकांनी बीएमएम अधिवेशनासाठी न्यू जर्सीला येण्याची योजना आखली असेल. आपल्या अधिवेशनासाठी आता सहा महिन्यांपेक्षा कमी वेळ उरला आहे. नावनोंदणी(रजिस्ट्रेशन) केलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सर्वांचा उत्साह आणि उत्कंठाही आता शिगेला पोहोचली आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला येणाऱ्यांचे आदरातिथ्य अधिकाधिक चांगले कसे करता येईल आणि त्यांना ह्या अधिवेशनाचा जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल ह्यासाठीच्या तयारीत कार्यकर्ते व्यस्त आहेत.
तुम्‍हाला कळवण्‍यास आनंद होत आहे की बहुतेक कार्यक्रम जवळपास निश्चत झाले आहे आणि भारतातील बहुतांशी कार्यक्रमाचे करार पूर्ण होण्याच्या अंतिम टप्यात आहेत. कार्यक्रमाचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, ते बघून तुम्हाला “कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको”असे होईल याचं कारण असं की भारतातून दर्जेदार कार्यक्रम तर आपण आणतोच आहोत त्याशिवाय उत्तर अमेरिकेतील विविध राज्यातील सर्वोत्तम कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे. उत्तर अमेरिकेतील कलाकारांना कलागुण दाखविण्याची संधी देणे हे ह्या संमेलनाचे एक उद्दिष्ट आहे. संगीत, नृत्य, नाट्य, विनोद, साहित्य अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांचे प्रदर्शन करण्यासाठी ह्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन उपलब्ध करून देते.
ह्या संमेलनात आपले अंदाजे ५००० मराठी उपस्थित ३ वर्षानंतर प्रथमच एकत्र येणार आहेत. साहित्य व संगीत ह्याच्या सोबतच सामाजिक जबाबदारीवर प्रेम करणाऱ्या आपल्या मराठी समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यासाठी आम्ही अनेक नामवंत कलाकार आणि अत्यंत प्रभावी व्यक्तित्व असलेली मंडळी खास तुमच्या भेटीसाठी बोलावली आहे.

  • आपल्या सर्वांचे लाडके नामवंत गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन बीएमएम अधिवेशनात तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी संगीताचा अप्रतिम नजराणा घेऊन येत आहेत.
  • पद्मश्री डॉ. श्रीकांत दातार, डॉ.आनंद देशपांडे आणि सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर अशा प्रमुख व्यक्तींनी त्यांच्या सहभागाला पुष्टी दर्शवली आहे.
  • उत्तम कलाकृती पेश करणारे पुढील ख्यातनाम कलावंत निश्चित झाले आहेत. – प्रशांत दामले, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर, मुक्ता बर्वे, मंगेश कदम आणि लीना भागवत.
  • उत्तर अमेरिकेतील ७ कार्यक्रम विविध राज्यांमधून जाहीर करण्यात आली आहे.
    •  न्यू जर्सी – कॅम्प वळिवडे
    •  व्हर्जिनिया – जरी पटका
    •  शिकागो (इलिनॉय) – ऐंका रंगदेवते तुझी कहाणी
    •  कॅलिफोर्निया – रसिकांचा हृदयस्थ तारा
    •  टेक्सास – शेक्सपियर एक्सपेरिमेंट
    •  लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया)- अंतरीच्या गूढगर्भी
    • अनेक राज्यांनी एकत्र येऊन सादर केलेले – मराठी अस्तित्व
  • ढोल ताशा स्पर्धा जाहीर केली आहे.

उत्तर अमेरिकेत अनेक मराठी उद्योजक मंडळी आहेत आणि उद्योजक बनू इच्छिणारे अनेक मराठी लोकही आहेत. बीएमएम अधिवेशन अशा लोकांना नेटवर्किंगची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. बिझनेस कॉन्फरन्ससाठी आपल्याकडे Day 0 साठी प्रतिष्ठित वक्ते तर आहेतच पण प्रथमच बिझनेस कॉन्फरेन्स फक्त Day 0 ला नसून अधिवेशनाच्या सर्व दिवसांसाठी वाढवली आहे. ह्या संधीचा लाभ होतकरू मराठी उद्योजक घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.
ह्याव्यतिरिक्त इतर व्यावसायिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीला ठेवणारा एक्स्पोही अधिवेशनात असणार आहे. ज्या लोकांना आपली उत्पादने हजारो मराठी लोकांसमोर आणायची आहेत अशा उद्योजकांसाठी ही चांगली संधी आहे. एक्स्पोमधे आपला बूथ लावण्यासाठी सर्व माहिती bmm2022.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पालकांना अधिवेशनाची मजा तेव्हाचं मिळते जेव्हा ते आपल्या लहान मुलांच्याबाबतीत निर्धास्त असतात. गेल्या वृत्तामधे आपल्या “डे केअर” ह्या सुविधेबद्दल मी उल्लेख केला होता. ३ ते १३ वयोगटातील मुलांकरता “डे केअर” आवश्यक सोयींनी परिपूर्ण असेलच पण त्यामधे मुलांचे मनोरंजनाचे आणि त्यांना गुंतवून ठेवणारे उपक्रम असणार आहेत शिवाय मराठी संस्कृती जोपासण्याचा भाग म्हणून मराठी कार्यशाळेचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी विशेष तसदी घेण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या पुढच्या वृत्तात मी जरूर देईन.
आमची तिकिटे आणि देणगीदारांची पॅकेजेस वेगाने विकली जात आहेत. पण तिकीट बुक करण्यासाठी आणि तुमची नोंदणी पूर्ण करण्यासाठी अजून वेळ आहे. जर तुम्हाला अधिक चांगल्या जागा हव्या असतील तर तुम्ही आमची देणगीदार पॅकेजेस खरेदी करू शकता आणि चांगल्या जागा लॉक करू शकता.
अधिक माहितीसाठी https://bmm2022.org संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
जसा प्रत्येक उगवता दिवस आशा-अपेक्षांची, स्वप्नांची नवकिरण घेऊन अवतरतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीचे अनेक पल्ले यशस्वीपणे पार करून आगेकूच करतो आहे, कार्यकर्त्यांची उमेद द्विगुणित करतो आहे आणि त्याचा आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो.

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी
बीएमएम २०२२ संयोजक