California
ज्यांच्या हातून वैश्विक वाङ्मयाची निर्मिती झाली असे एक महान कवी, नाटककार, साहित्यिक, विचारवंत, तत्वज्ञ व सच्चे समाजसेवक म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज!
साऱ्या “रसिकांचा हृदयस्थ तारा” म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज!
‘‘रसिकांचा हृदयस्थ तारा’’ हा कार्यक्रम म्हणजे कुसुमाग्रजांच्या साहित्य महासागरातून वेचून आणलेल्या माणिक-मोत्यांचा हार आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारे व रोमांचक नाट्यप्रवेश, विस्मयकारक आणि पूर्वी कधी पाहिले नसतील असे एकमेवाद्वितीय नृत्याविष्कार, नवा दृष्टिकोन देणारे व मनोरंजक अभिवाचन, हृदयस्पर्शी व मन चिंब करणाऱ्या काव्यधारा, मंत्रमुग्ध करणारे कर्णमधुर गायन, माहितीपूर्ण आणि लक्षवेधी निवेदन, अशा विविधरंगी रत्नांनी हा हार जडवला आहे. काही परिचित आणि काही अपरिचित अशा त्यांच्या साहित्याचा हा नाविन्यपूर्ण, हृदयस्पर्शी आणि मनमोहक आविष्कार आहे.
संगीतप्रेमी, नाट्यप्रेमी, नृत्यप्रेमी, काव्यप्रेमी, कथाप्रेमी, साहित्यप्रेमी, कलाप्रेमी अशा सर्वांनी आवर्जून पहावा असा हा कार्यक्रम आहे.
काहीतरी वेगळे, हृदयाला भिडणारे, कलात्मक आणि मनोरंजक ऐका, पहा व अनुभवा.