MULTI STATES EVENT

स्वयंप्रकाशी स्वरतारे

When
Which State?

Multiple States within USA

Key Performers

Performers from Arizona (AZ), New Jersey (NJ) and Washington (WA)

“लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या”

सुमारे ९० वर्षांपूर्वी अयोध्येचा राजा या बोलपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट संगीताचा लखलखता तेजस्वी प्रवास सुरु झाला. अभिजात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, पारंपरिक, लोकसंगीत अशा विविध प्रवाहांच्या मिलाफातून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठी चित्रपट संगीताची परंपरा गेली अनेक दशके प्रतिभावान संगीतकारांनी अतिशय समर्थपणे चालू ठेवली. गेल्या दोन दशकातील मराठी चित्रपट संगीताच्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या, सांगीतिक प्रतिभेने स्वयंप्रकाशी असणाऱ्या तरुण ताज्या दमाच्या स्वरताऱ्यांचा म्हणजेच मराठी चित्रपट संगीतकारांचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम - स्वयंप्रकाशी स्वरतारे.

२०२२ मध्ये न्यू जर्सी येथील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात ‘अस्तित्वाचा ‘ सोहळा साजरा करताना - ज्या तरुण संगीतकारांनी गेली दोन दशके मराठी चित्रपट संगीताच्या अस्तित्वाची, वैभवशाली परंपरेची मशाल ज्या ताकदीने, जिद्दीने आणि प्रतिभेने हाती धरली , क्वचित प्रतिकूल परिस्थितीत किंवा इतर भाषांच्या, संगीत प्रणालींच्या आव्हानापुढे मराठी चित्रपट संगीताचे अस्तित्व फुलवले अशा संगीतकारांना मानवंदना दिल्याशिवाय मराठी अस्तित्वाचा सोहळा कदाचित अपूर्ण राहील. आणि म्हणूनच अमेरिकेतील आम्ही काही कलाकारांनी एकत्र येऊन केवळ BMM २०२२ च्या अधिवेशनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. शंकर एहसान लॉय यांच्या ‘मन मंदिरा’पासून ते अजय अतुलच्या ‘वाजले कि बारा’; ह्रिषीकेश सौरभ जसराज यांच्या ‘आनंदघन ‘ पासून ते अविनाश विश्वजीत यांच्या ‘कधी तू ‘ या प्रेमगीतापर्यंत , अवधूत गुप्तेच्या ‘कांदे पोहे ‘ पासून अजय अतुलच्या ‘लल्लाटी भंडार’ या गोंधळापर्यंत विविध गाण्यांचा समावेश असलेला हा कार्यक्रम! कौशल इनामदार,डॉ सलील कुलकर्णी , निलेश मोहरीर अशा गुणी संगीतकारांच्या रचना प्रेक्षकांना भारावून टाकतील.