Los angeles, California Event

अंतरीच्या गूढगर्भी

When
Which State?

Los Angels, California

Key Performers

“अभिव्यक्ती” लॉस एजेंलिस आणि महाराष्ट्र मंडळ लॉस एजेंलिस (MMLA)

प्रत्येक माणसाचं आयुष्य़ हा एक प्रवासच असतो. जन्मापासून मृत्यूकडे जातानाचा हा प्रवास समृद्ध होतो तो सहज येणाऱ्या आणि आवर्जून घेतल्या जाणाऱ्या अनुभवांनी. जगता जगता तो एक गावच वसवतो त्या अनुभवांचं.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या गावाची सैर करणार आहोत, बघणार आहोत काही सुखाच्या वस्त्या, काही दु:खाचे गल्लीबोळ. ऐकणार आहोत बांधावरच्या काटेरी बाभळीची सळसळ, झेलणार आहोत प्रीतरंगाचे चांदणे, कधी पांघरून घेणार आहोत कुटुंबमायेचे मऊशार ढग तर कधी भिजणार आहोत नात्यांचा अलवार पावसात. आणि हलकेच कधी कानोसा घेणार आहोत, देवराईच्या गूढतेचा.

या बरोबरच वेशी बाहेरच्या वाटा ज्या कधीच वहिवाटा होऊ शकत नाहीत, त्या अनवट वाटांवरचे काही अव्यक्त, मनातच कोंडून ठेवलेले हुंकारांना इथे वाचा फुटेल. एरवी कुजबुजीतच विरणाऱ्या अस्पर्श अशा अनुभवांना सजगपणे बघूया, आपली समजुतीची क्षितिजं विस्तारुया.