नमस्कार मंडळी,

It snows! It snows! From out the sky

The feathered flakes, how fast they fly…

हिमवर्षाव म्हटला म्हणजे हळूवार अशा कविमनांना बहर येतो.अगदी आपल्या मराठी हिंदी गाण्यांतूनही

हिमवर्षावाची रोमॅंटिक वर्णने आपल्यासमोर आलेली असात.परंतु एवढ्या वर्षांच्या इथल्या वास्तव्यात एक

गोष्ट मात्र चांगलीच कळलेली आहे की एरवी मोहक वाटणारे हे पांढरेशुभ्र हिमकण जेव्हा रौद्र रूप धारण

करतात तेव्हा कसा हाहाकार उडतो.

काही दिवसांपूर्वी टेक्सास मध्ये हीच परिस्थिती ओढवलेली आपण

बघितली.आधीच कोव्हिड-19 च्या संकटाशी झुंजत असलेल्या यंत्रणांवर अचानक कोसळलेले हे

संकट.अशावेळी सामाजिक भान जागे ठेवत BMM ही मदतीसाठी पुढे सरसावले. संकटात मदतीचा हात

देण्यासाठी BMM दीपस्तंभ ह्या उपक्रमाखाली पुढे सरसावले आहे . लोकांच्या अडचणी योग्य त्या सरकारी खाते

आणि सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा एक दुवा म्हणून BMM सतत प्रयत्नशील असते. केवळ

नैसर्गिक संकटेच नव्हे तर उत्तर अमेरिका आणि बाहेरील मराठी बांधवांना कुठल्याही मदतीची गरज

असल्यास BMM च्या पुढील टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा

BMM HELP LINE

1-833-BMM-NAOL

मंडळी, BMM च्या 2022 साली होणाऱ्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे हे आपण

जाणताच.जवळपास तीन वर्षांच्या विरामानंतर प्रत्यक्षात भेटण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.हे अधिवेशन

यशस्वी आणि संस्मरणीय करण्यासाठी आपला भरघोस प्रतिसाद व सहभाग अपेक्षित आहे.BMM 2022 या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी या ग्रूपमध्ये जरूर सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/DwPfj2qlVWR5U5QtmOAkD2

मंडळी ,असं म्हणतात मन चंगा तो कठौती मे गंगा .माणसाचं प्रचंड सामर्थ्यशाली मन नैराश्याचे आगार न

होता नवनवीन कल्पना,उमेद आणि आनंद यांनी बहरलेले झाड व्हावे हीच मनापासू इच्छा!कळावे लोभ असावा,

आपली नम्र ,

विद्या जोशी

अध्यक्ष्या, बृहन महाराष्ट्र मंडळ

[email protected]