Cooking competition

Cooking Competition Nov 2021

नमस्कार, नमस्कार, नमस्कार!
 
मंडळी, असं म्हणतात की सुखाचा मार्ग हा पोटातून जातो! काय, खरंय ना? चला तर मग, तुम्हा सर्वांसाठी BMM 2022 घेऊन येत आहे एक आगळी वेगळी स्पर्धा – “स्वाद न्यू जर्सीचा” एक पाककला / पाककृती स्पर्धा! होय नीट वाचलंत, पाककला स्पर्धा!
 
मंडळी, पुरूष असो अथवा स्त्री, आपल्या सर्वांमधे एक बावर्ची / आचारी दडलेला असु शकतो. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्यातील आचाऱ्याला तुम्हाला संधी देता येणार आहे – आणि बरं का मंडळी, यशस्वी विजेत्या पाककृतीचा समावेश २०२२ च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातील जेवणामधे करण्यात येणार आहे!!! आहे की नाही ही चमचमीत बातमी?
 
अहो, चला तर मग, त्वरा करा आणि या स्पर्धेसाठी नाव नोंदवा.
 
स्पर्धा दिनांक व वेळ : २० नोव्हेंबर २०२१, दुपारी २:००
स्थळ : मराठी विश्व सभागृह, न्यू जर्सी (143 NJ 35, Laurence Harbor, NJ 08879)
संपर्क : पुजा शिरोडकर (732-492-5694), रूपाली घोडेकर (518-461-0619)
 
धन्यवाद,
बृहन्महाराष्ट्र मंडळ, अधिवेशन समिती २०२२